Ad will apear here
Next
अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीतर्फे हेल्मेट वापराचा निर्धार

पुणे : अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीने (एडीवायपीयू) हेल्मेट वापरासाठी सहकार्य करायचा निर्णय घेतला असून,  संस्थेतील विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षकांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘एडीवायपीयू हेल्मेट नियमांचे शंभर टक्के पालन करत आहे’, असा संदेश देणारा उपक्रमही संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य पाटील यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. 

अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीने हेल्मेट वापरासंबंधी विशेष उपक्रम राबवला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्यासह 'एडीवायपीयू'चे संचालक ह्र्द्येश देशपांडे.

या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. अजिंक्य पाटील म्हणाले, ‘आमच्या विद्यार्थ्यांना उद्याचे सुजाण नागरिक बनविणे हा आमच्या विद्यापीठाचा एक भाग आहे. सर्वांना सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ध्वनी प्रदूषण आणि रस्ता सुरक्षा हे दोन विषय सध्या आम्ही अग्रस्थानी ठेवले आहेत.’

रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीने वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्याबरोबर एका विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत एक सादरीकरण केले.
    
रस्ता सुरक्षा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबाबत सातपुते यांनी अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे कौतुक केले. रस्ता सुरक्षेबाबत एज्युकेशन, इंजिनीअरींग आणि एन्फोर्समेंट या तीन ‘इ’चे महत्त्व त्यांनी सर्वांना सांगितले; तसेच विद्यार्थ्यांना हेल्मेटचा वापर करण्यासाठी आणि रहदारीचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन दिले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOABU
Similar Posts
‘प्रियजनांवर प्रेम असेल, तर हेल्मेट अवश्य वापरा’ पुणे : ‘मी पुण्याची असून, पुण्याविषयी मला नेहमीच प्रेम आहे. मात्र, हेल्मेट न घातल्याने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. हे रोखण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. सुरक्षित प्रवास ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्या प्रियजनांवर प्रेम असेल तर हेल्मेट अवश्य वापरा,’ असा सल्ला प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने दिला आहे
पुण्यात टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : झेनेक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड व पुणे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रिमियर ग्रुप, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणि संचेती हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आयोजित टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राइडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने या राइडचे आयोजन करण्यात आले होते
‘इंधन दरवाढ नियंत्रणासाठी सरकारचा पर्यायी इंधनवापरावर भर’ पुणे : ‘पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत; पण आता पर्यायी इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार वीजेवरील, हायब्रीड, तसेच इथेनॉल आणि बायोसीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देत आहे. येत्या सहा महिन्यांत अशी वाहने बाजारात येतील
‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या ‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये क्लीन बसेसबाबत महाराष्ट्राचे धोरण स्पष्ट केले. या परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language